आशा स्वयंसेविकांच्या पगारात मोठी वाढ ! आता एवढा पगार मिळणार

Join Telegram Channel Join Telegram Channel

Asha Swayamsevika Bhatta Increment राज्य सरकारच्या निधीतून राज्यातील आशा स्वयंसेविकांना दिल्या जाणाऱ्या मानधनात पाच हजार रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही वेतनवाढ नोव्हेंबर २०२३ पासून लागू होणार आहे.

नगर परिषद मध्ये विविध रिक्त पदासाठी भरती , लगेच करा आवेदन !

सरकारी नोकरी : पाटबंधारे विभाग जळगाव अंतर्गत या उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाढीव मोबदला देण्यासाठी नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीसाठी रु.200.21 कोटी अतिरिक्त खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच 961.08 कोटी वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान, तळागाळातील लोकांना आरोग्य सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांना आज खरा न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य आशा-समूह प्रवर्तक अक्रम कृती समितीचे राजेश सिंह यांनी व्यक्त केली. मुंबईतील आशा स्वयंसेविका स्वाती कांबळे यांनी आम्हाला पूर्ण रक्कम कधीच मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. केंद्र सरकारकडून आम्हाला दोन हजार रुपये मानधन दिले जाते; पण आम्हाला 1,650 रुपये पगार मिळतो. हजार रुपयांची वाढ झाल्यापासून 750 रुपये मिळाले आहेत. 500 कोविड भत्ता म्हणून. मोबदला वाढला; मात्र त्यातील निम्माच मिळतो, अशी तक्रार कांबळे यांनी केली.

Leave a Comment